Sunday , April 5 2026
Breaking News

विविध ऑलंपियाड परीक्षेमध्ये मोहनलाल दोशी विद्यालयाचे यश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित, इंग्लिश, हिंदी ऑलम्पियाड परीक्षेत यशसंपादन केले आहे. त्यामध्ये गणित विषयात सातवीतील यश राजाराम सावंत तर दहावी मधील रोशनी मोहन बोंगार्डे, श्रावणी गिरीश पोकले, श्रावणी संदीप पोतदार यांनी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
इंग्लिश विषयातून इयत्ता सातवीतील दूर्वा अनिल वडे, गायत्री पाटील, गायत्री चौगुले तसेच आठवीच्या नम्रता मगदूम यांनी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले. हिंदी विषयातून
सहावीतील रीदम कंग्राळकर, समर्थ पाटील, सुयोग पावले तर
सातवीतून कौस्तुभ गंथडे, श्रुतिका सुतार, स्स्ली संदीप पेडणेकर, नववीतुन अन्वेषा पाटील, मयुरा साळुखे, शर्वरी पाटील, प्रज्ञा कांबळे, प्रतिक्षा तोडकर यांनी बाजी मारली. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह संचालकांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले एस. बी. यादव, एन. एन. गुरव, एस. एम. मगदूम, एस. एम. जाधव, एस. जी. खोत, यु. एम. सातपुते, आर. आर कपले, एस. के. बुच्चे यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील म्हैस पळविण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सूर्यवंशींची म्हैस प्रथम

Spread the love  निपाणी (वार्ता) : हनुमान जयंतीनिमित्त बोरगाव येथील वीर बजरंगबली सेवा संघातर्फे दुचाकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *