Sunday , April 5 2026
Breaking News

सौंदलगा येथे येणाऱ्या प्रमुख वक्त्यावर बंदी घाला

Spread the love

 

ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; तहसीलदार कार्यालयाला निवेदन

निपाणी (वार्ता) : सौंदलगा येथे होत असलेल्या हिंदू संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद एकबोटे हे उपस्थित राहणार आहेत. भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी असून त्यांची वक्तव्ये दलित हिंदू,- मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा बिघडवणे, संविधान विरोधी आणि जातीय दंगली भडकवणारी आहेत.
असतात त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावरगुन्हे दाखल करून सर्व जिल्ह्यात जिल्हा बंदी घातली आहे. त्यामुळे सौंदलगा येथील त्यांच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस ठाण्यासह येथील तहसीलदार कार्यालयाला दिले.
निवेदनातील माहिती अशी, बेळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचे व्याख्यान आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १४ एप्रिलला होणाऱ्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जातीय दंगली घडविण्याचा उद्देश असू शकतो. म्हणून कर्नाटक सरकारने याची नोंद घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा व्यक्तीच्या व्याख्यानासह बेळगाव जिल्हा बंदी करावी. सदर व्याख्यानावर बंदी न घातल्यास व्याख्यान दिवशी कार्यक्रम स्थळी जाऊन काळे झेंडे दाखवून निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोककुमार असोदे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित शिंदे, शहराध्यक्ष संदीप माने, भुपाल माने, गणु गोसावी, कबीर वराळे, जीवन कांबळे, किरण मेस्त्री, गोपाळ मेस्त्री, ह्रतिक कांबळे, गणेश कांबळे, नितीन कांबळे, सिध्दोजी कांबळे, चंद्रकांत कांबळे, विजय कांबळे, प्रकाश कांबळे, समीर कांबळे, विश्वजीत कांबळे, सुंदर माने, ईश्वर शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील म्हैस पळविण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सूर्यवंशींची म्हैस प्रथम

Spread the love  निपाणी (वार्ता) : हनुमान जयंतीनिमित्त बोरगाव येथील वीर बजरंगबली सेवा संघातर्फे दुचाकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *