Monday , September 21 2026
Breaking News

घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा

Spread the love

 

बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन असलेल्या श्री घुमटमाळ मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त 1 व 2 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एक रोजी सायंकाळी संगीत गुरु शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती महिला मंडळाच्या महिलांनी भजन सादर केले. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भजनाचा कार्यक्रम झाला.
गुरुवारी पहाटे अभिषेक व त्यानंतर ह भ प कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे हनुमान जन्मोत्सवावर कीर्तन झाले. ठीक सव्वा सहा वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम पाळणा गीतांनी व गीत गायनाने झाला.
एक्सलंट योगा क्लासेसचे योगगुरू शंकरराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक श्रीराम रक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठाण करण्यात आले. यामध्ये अनेक स्त्री-पुरुषांनी भाग घेतला.
दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसाद झाला ज्यामध्ये हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. माजी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक नितीन जाधव यांनी उपस्थित राहून महाप्रसाद वाटपात सहभाग घेतला. ट्रस्ट कमिटी सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. याप्रसंगी अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, उपाध्यक्ष कुलदीप भेकणे, सचिव प्रकाश माहेश्वरी याचबरोबर सदस्य बाबुराव पाटील, संभाजी चव्हाण, गोपाळराव बिर्जे, अनंत लाड, नेताजी जाधव रघुनाथ बांडगी, सुनील चौगुले, चंद्रकांत पवार, विक्रम चिंडक, हिरालाल पटेल, सुनील सरनोबत, पुजारी बाळू किल्लेकर आदींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अनेक भाविकांनी महाप्रसादासाठी सढळ हस्ते देणग्या दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *