Monday , September 21 2026
Breaking News

प्रकाश मरगाळे यांचा म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल बेळगावमधील मराठा आणि मराठी प्रेमी म ए समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मरगाळे यांचे अभिनंदन करून समितीच्या कार्याला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना प्रकाश मरगाळे यांनी बेळगावमधील सीमाप्रश्नासाठी राबवण्यात येणाऱ्या आगामी मोहिमेची माहिती दिली. सीमाप्रश्नावर मराठी भाषिकांची एकजूट दाखवण्यासाठी एक लाख सह्यांची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने काम करावे, असे आवाहन मरगाळे यांनी यावेळी केले.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी रमाकांत कोंडूस्कर, संजय सातेरी, सुधा भातकांडे, संजय शिंदे, सागर पाटील आणि विजय भोसले यांच्यासह प्रशांत भातकांडे, कपिल भोसले, संजय भाकोजी, बाळू जोशी, मनोहर सांबरेकर, राजेंद्र बिर्जे, संदीप हादगल आणि इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *