Monday , September 21 2026
Breaking News

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात प्रवेशाची संधी

Spread the love

 

बेळगाव : सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमाभागातील एकूण 865 गावातील जे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेवू इच्छितात त्यांच्यासाठी शिवाजी विद्यापीठाने फी सवलत जाहीर केली आहे. यामध्ये अनुदानित अभ्यासक्रमाांसाठी संपूर्ण ट्यूशन फी व विनाअनुदानित अभ्यासक्रमाांसाठी 25% ट्युशन फी माफ करण्यात आली आहे. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश घेवू इच्छितात त्यांच्याकरीता वसतिगृहाची फी माफ करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमाांची प्रवेश परीक्षा दि. 12 मे ते दि. 15 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून त्याकरीता व ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा नाही अशा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी दि. 27/04/2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

सीमाभागातील विद्यार्थ्यांनी https://www.unishivaji.ac.in/mscadmission/For-Studentinformation या संदर्भातील सविस्तर तपशील करुन ईच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व नजीकच्या काळात कार्यशाळा लवकरच बेळगाव येथे आयोजित केली जाणार आहे. या संधीचा लाभ सिमावासिय विद्यार्थ्यांनी करुन घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *