Sunday , April 5 2026
Breaking News

दक्षिण भारत जैन सभेच्या वर्धापन दिनी बोरगावच्या मीनाक्षीताई पाटील यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : दक्षिण भारत जैन सभेचा १२७ वर्धापन दिन कोल्हापूर येथे पार पडला. त्यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मीनाक्षीताई पाटील यांचा गौरवशाली सन्मान करण्यात आला.
दक्षिण भारत जैन सभा व तिची पहिली शाखा जैन महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
समारंभात अरिहंत उद्योग समूहाच्या मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभातर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा राष्ट्रीय आदर्श पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त जैन सभेतर्फे विशेष गौरव व सन्मान करण्यात आला. सदर सन्मान शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, जैन महिला परिषदेच्या अध्यक्षा अनिता विनोद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मीनाक्षीताई पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिल्यास जैन समाजाची प्रगती होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. याशिवाय अरिहंत उद्योग समूह सर्वसामान्यांच्या पाठीशी असून या पुढील काळातही पाटील कुटुंबीयाना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, अध्यक्ष संजय शेटे, मुख्य महामंत्री अनिल बागणे, खजिनदार बाळासाहेब पाटील, संचालक दादासाहेब पाटील, महिला परिषदेच्या उपाध्यक्ष सरिता चौगुले यांच्यासह दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी कार्यकर्ते व श्रावक, श्राविका उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव येथील म्हैस पळविण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सूर्यवंशींची म्हैस प्रथम

Spread the love  निपाणी (वार्ता) : हनुमान जयंतीनिमित्त बोरगाव येथील वीर बजरंगबली सेवा संघातर्फे दुचाकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *