Sunday , July 26 2026
Breaking News

सर्वोत्तम श्राविका पुरस्काराबद्दल मीनाक्षी पाटील यांचा निपाणीत सत्कार समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानिमित्त त्यांचा निपाणी शहरात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. सहकाररत्न उत्तम पाटील, विनयश्री अभिनंदन पाटील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत निलांबरी तारळे, यशोधन तारळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. येथील माजी नगरसेविका उपासना सचिन गारवे, सामाजिक कार्यकर्ते, सचिन गारवे, सुनील तावदारे, वैभव निंबाळकर आणि प्रभाग क्रमांक ३० मधील उत्तम पाटील प्रेमी कार्यकर्त्यातर्फेतर्फेही सत्कार करण्यात आला.
येथील सामाजिक कार्यकर्त्या नाझ मुजावर, मंगल वागळे, वैशाली पोटले, सुकेशनी शिंदे, शोभा निगवे यांनीही मीनाक्षी पाटील यांचा सत्कार केला.
मीनाक्षी पाटील यांनी सत्काराबद्दल प्रतिज्ञा व्यक्त करून या पुढील काळात ही महिलांच्या प्रगतीसाठी अरिहंत उद्योग समूह सर्वांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *