Thursday , April 9 2026
Breaking News

सर्वोत्तम श्राविका पुरस्कार मिळाल्याने मीनाक्षी पाटील यांचा विविध संस्थातर्फे सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संस्थेच्या संचालिका मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील संस्थेच्या संचालिका आदरणीय श्रीमती मीनाक्षीआई रावसाहेब पाटील यांना नवी दिल्ली येथील भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभेतर्फे ‘सर्वोत्तम श्राविका’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र स्तवन निधी कमिटीतर्फे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी क्षेत्र स्तवनिधी कमिटीचे अध्यक्ष आर. बी. खोत, उपाध्यक्ष सुंदर पाटील, बाळासाहेब मगदूम, आनंद उगारे, तात्यासाहेब पाटील, विलास उपाध्ये, इंद्रजीत पाटील, सुनील अम्मन्नवर, राजेंद्र कंगळे, संजय निलजगी, भारत पाटील महावीर खेमलापुरे यांच्यासह कमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
बोरगाव येथील धनगर समाजातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाक्षीताई पाटील यांचा त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोरगाव पी.के.पी.एस व अरिहंत सूतगिरणीचे संचालक राजू ऐदमाळे, विठ्ठल ऐदमाळे, बाळू ऐदमाळे, बिरा ऐदमाळे, अनिल ऐदमाळे, बाळू नवाळू ऐदमाळे, दत्ता गावडे, विठ्ठल गावडे, रघू ऐदमाळे, म्हाळू ऐदमाळे यांच्यासह धनगर समाजातील नागरिक उपस्थित होते.
निपाणीचे माजी आमदार प्रा. सुभाष जोशी परिवारातर्फे सुनीता जोशी, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी यांनीही मीनाक्षी पाटील यांचा सत्कार केला. यावेळी विनयश्री अभिनंदन पाटील, धनश्री उत्तम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यमगर्णी येथील पी.के.पी.एस. तर्फे अध्यक्ष नितीन नेपीरे, उपाध्यक्ष संतोष पाटील, संचालक प्रशांत पोकले, शेतकरी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे अध्यक्ष चंद्रकांत पोकले, कुमार मंगावते यांनीही सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाक्षी पाटील यांचा सत्कार केला.

About Belgaum Varta

Check Also

हॉटेल चालकांना व्यावसायिक सिलेंडर वेळेत द्या

Spread the love  हॉटेल व्यवसायिकांची मागणी; गॅस वितरकांना दिले निवेदन निपाणी (वार्ता) : आखाती देशातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *