
निपाणी (वार्ता) : सीमा भागातील धारपवार समाजाची एकत्रीकरण बैठक व परिचय मेळावा रविवारी (ता.१२) सकाळी १०.३० वाजता साखरवाडीतील महर्षी वाल्मिकी भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्य प्रवर्तक डॉ. भालचंद्र पोवार व गोविंदराव पवार यांनी दिली आहे. या कार्यक्रमात परिचय चर्चा मनोगत व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
शहरासह सीमाभागातील धारपवार परिवाराचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे परिचय चर्चा मनोगत व शिवकालीन शस्त्र प्रदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
श्रीमंत राजेपवार घराणे सामाजिक – प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष सागरदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे माजी महापौर मंगेश पवार हे उपस्थित राहणार आहेत. शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमंत दादाराजे देसाई-निंबाळकर सरकार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास कोल्हापूर शिवसेनेचे उपनेते संजय पवार, पुरातन आणि शस्त्र संग्रहकव अभ्यासक अमरसिंह पाटील -धारपवार उपस्थित राहणार आहेत. शस्त्र प्रदर्शन नामदेव भवन साखरवाडी येथे तर स्नेहमेळावा वाल्मिकी भवन साखरवाडी निपाणी येथे होणार आहे. तरी समस्त धारपवार घराण्यातील समस्त बंधू-भगिनींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. भालचंद्र पवार व गोविंदराव पवार यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta