Tuesday , March 3 2026
Breaking News

मे मध्ये  द.भा. जैन सभेचे शंभरावे अधिवेशन

Spread the love
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर : बोरगावमध्ये संवाद बैठक
 निपाणी (वार्ता) : कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे १५ मे च्या दरम्यान द. भा. जैन सभेचे शंभरावे अधिवेशन भव्य स्वरुपात सांगलीत होणार आहे. त्यासाठी लाखाच्या संख्येत जैन समुदाय उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांचा समावेश असल्याची माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी दिली.
 बोरगाव येथील अरिहंत सभागृहात झालेल्या संवाद बैठकीत यड्रावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील होते.
डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले. अधिवेशन समितीचे सेक्रेटरी प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी मागील  बैठकांचा आढावा घेऊन इतिवृत्ताचे वाचन केले.
रावसाहेब पाटील म्हणाले, मे महिन्यात होणारे अधिवेशन १०० वे आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि जैन समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. सर्वांच्या सहभागाने हे अधिवेशन दिव्य स्वरुपात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठीसहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
आमदार अभय पाटील व माजी आमदार संजय पाटील यांनी अधिवेशन भव्य दिव्य स्वरुपात होण्यासाठी व यानिमित्ताने समाजाच्या प्रगतीसाठी स्थायी प्रकल्प तडीस नेण्यासाठी संपूर्ण सहकार्य राहील. या अधिवेशनात महाराष्ट्र व कर्नाटकातील जैन समाज ऐक्याचे दर्शन होईल. एकीच्या भावनेने अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वानी पुढे यावे. शासन पातळीवर जैन समाजाच्या हितासाठी आवश्यक ते सहकार्य राहणार असल्याचे सांगितले.
माजी आमदार शरद पाटील, मगेन्नावर व वीरकुमार पाटील यांनी समाजाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. आम्ही दक्षिण भारत जैन सभेबरोबर आहोत. समाजातील शेवटच्या घटकांना सहभागी करुन घेण्याचे आवाहन केले.केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील व सभेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी भगवान महावीर अध्यासनाला रावसाहेब पाटील यांनी २५ लाखांचे व सांगली जैन बोर्डिंगच्या सभागृहास चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी २१ लाखांची देणगी जाहीर केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र व कर्नाटकातील जैन समाजातील विद्यार्थ्यांनी लोकसेवा आयोग, पोलीस खाते आणि चार्टर्ड अकौंटट परीक्षा उत्तीर्ण करुन त्यांची विविध मोठ्या हुद्द्यावर निवड झाल्याबद्दल सभेतर्फे सत्कार करण्यात आला. बैठकीत सभेच्या विविध शाखांचे पदाधिकारी, सदस्य व अधिवेशन समितीच्या समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *