माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत डिजिटल मतदार नोंदणी कार्यक्रम
निपाणी(वार्ता) : राज्यात निवडणूकांचे वारे वाहू लागले असून भाजपा सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे. जनहिताच्या विरोधात सुरू असलेल्या कामकाजामुळे विद्यमान भाजपा सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना अखेर गुजरात राज्याबरोबरच कर्नाटकातही निवडणूका लागण्याची शक्यत आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागण्याची गरज आहे, असे मत माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. येथे आयोजित डिजिटल सभासद नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, पंकज पाटील, राजेंद्र वडुर – पवार, रोहन साळवे, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, माजी सभापती सुनिल पाटील, संजय पावले, शौकत मणेर, दिपक सावंत, दिलीप पठाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कर्नाटक राज्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार , माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या व अन्य पक्षश्रेष्ठच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणून जनहित साधण्याकरीता काम सुरू आहे. आपल्या भागातूनही पक्षसंघटन मजबूत करून आगामी निवडणूकीत विजय संपादन करण्यासाठी काम करूया. डिजीटल सभासद नोंदणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या परीने वेळ द्यावा. प्रत्येक बुथवरील प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जावून डिजीटल सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घ्यावे असे आवाहनही काकासाहेब पाटील यांनी केले.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, देशव्यापी सुरू करण्यात आलेल्या काँग्रेसच्या डिजीटल सभासद नोंदणीस निपाणीतही मोठा प्रतिसाद मिळत आहे. हजारो नवीन कार्यकर्ते या माध्यमातून काँग्रेस पक्षाशी जुळत असून संघटन आणखीन बळकट होत आहे. राज्याचे काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली सभासद नोंदणीचे काम जोमाने सुरू आहे. लाखो कार्यकर्ते पक्षाच्या विचारांशी बांधील होवून पक्षकार्यात हिरीरीने सहभागी होत आहे. निपाणी भागातही काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली डिजीटल सभासद नोंदणीचे काम सुरू आहे. मतदारसंघात प्रत्येक गावातील कार्यकर्ते त्यामध्ये गुंतले आहेत.
यावेळी राजेश कदम, बसवराज पाटील, पंकज पाटील, राजेंद्र वडुर, सुनील पाटील, बाळासाहेब सरकार, किरण कोकरे, आप्पासाहेब पाटील, धनाजी चव्हाण, बाळासाहेब सुर्यवंशी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय शेटके, अल्लाबक्ष बागवान, जीवन घस्ते, रविंद्र चंद्रकुडे, अन्वर बागवान, शरीफ बेपारी, सुधाकर सोनाळकर, बाळासाहेब जासूद, भालचंद्र पारळे, संजय पाटील, शशीकांत चडचाळे, रविंद्र श्रीखंडे, किसन दावणे, सचिन हेगडे, संजय स्वामी, संतोष मोरे, संजय जाधव, मुन्ना पटेल, आनंदा तोडकर, प्रकाश पोटजाळे, बाळासो मोरबाळे, शितल बुडके, अमोल चंद्रकुडे, निखिल चंद्रकुडे, प्रशांत साजण्णावर, दिपक वळीवडे, अमोल बन्ने, यासिन नदाफ यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील डिजीटल सभासद नोंदणीशी संबंधित कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.