Tuesday , March 3 2026
Breaking News

मंत्री, खासदारांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार

Spread the love
राजू पोवार : तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य  राज्य रयत संघटना कोणतेही जात, धर्म, पंत, पक्ष न पाहता, केवळ शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे. शेतकऱ्यांच्या समस्यचे  निवारण करण्यासाठी संघटना प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी व सन्माननीय माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव करून निवेदने दिलेली आहेत. यापुढील काळात शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास मंत्री, खासदारांच्या दारात आंदोलन केले जाईल, अशी माहिती कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिली.
ते निपाणी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयाला विविध मागणीचे निवेदन देताना बोलत होते.
 राजू पोवार म्हणाले, अतिवृष्टी व पावसाने पडलेल्या घरांचा सर्वे निपक्षपाती व्हावा, सर्वे करता असताना कोणीही चुकीची माहिती दिली असता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, गावातील पीकेपीएस, पथदीप जोडणे, पूरग्रस्त घरांचा सर्वे हा कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता पक्षविरहित करावा,  एप्रिल महिन्याच्या शेवटीपर्यंत सर्व कामे मार्गी लावावीत, अन्यथा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे हजारो शेतकरी याला जबाबदार असणाऱ्या मंत्री, खासदारांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू पोवार यांनी दिली आहे.
शहराध्यक्ष उमेश भारमल, अमोल नवाळे, संजय नाईक, बबन जमादार, शिवाजी वाडेकर, बाळासाहेब कांबळे, शिवाजी पाटील, पडलिहाळ पीकेपीएस अध्यक्ष संजय स्वामी, पडलीहाळ शाखा अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सेक्रेटरी सचिन पाटील, कार्याध्यक्ष सागर जाधव, शंकर शिंत्रे, बाबासाहेब शेगळे, आनंदा मोरे, दिनकर पाटील,  रणजीत जाधव, शरद पाटील, रमेश पाटील, विनायक भोसले, युवराज पाटील, मारुती शिंदे, शिवाजी खोत, ओमकार शिंदे मनोहर पाटील, शरद पाटील, सर्जेराव हेगडे, पवन माने, सौरभ कदम, कारदगा जिल्हा पंचायत अध्यक्ष बबन जमादार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी शेतकरी वर्ग उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *