Sunday , July 26 2026
Breaking News

अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडी रहिवाशांना दिलासा

Spread the love

आमदारांनी संबंधित विषयी केली धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा
बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदारांनी संबंधित विषयी धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली.
वक्फ बोर्डाने आनंदवाडी येथील रहिवाशांच्या राहत्या जागा ताब्यात घेण्यासाठी खटाटोप चालविला आहे. यामुळे येथील रहिवाशांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
आमदार अभय पाटील यासह श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर यांनी येथील रहिवाशांना विस्थापित होण्यापासून वाचविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
याच मुद्द्यावर दक्षिण आमदारांनी संबंधित विषयी धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा केली. आनंदवाडी येथील रहिवाशांसह आमदार अभय पाटील यांनी बेंगळूर येथे धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. त्यावेळी हा मुद्दा समजून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती तातडीने देण्यासंदर्भात मंत्री जोल्ले यांनी सूचना केल्या.
याप्रसंगी नगरसेवक नितीन जाधव यांच्यासह शशिकांत रणदिवे, पवन धोंगडी, सोमनाथ रंगरेज, चंद्रकांत धोंगडी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *