Sunday , December 14 2025
Breaking News

मांगुर फाट्याजवळ आयशर ट्रक पलटी

Spread the love

सौंदलगा : सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या मांगुर फाट्याजवळ आयशर ट्रक शेतात पलटी होऊन पडल्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी कोणतीही जिवितहानी झाली नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रात्री ८ च्या सुमारास गुजरात वरून बेळगावकडे निघालेला आयशर ट्रक एमएच.१० सीआर ८७४८ हा ट्रक रोहित बागडे (रा.इचलकरंजी) यांच्या मालकीचा असून हा ट्रक ड्रायव्हर राजू जावळगे (अप्पू) (वय.२३, रा. इचलकरंजी) घेऊन लोकल रस्त्यावरून बेळगावकडे जात होता. पण मांगुर फाट्याजवळ आल्यानंतर ट्रकचे टेरिंग लॉक झाल्याने ट्रकवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले व ट्रक दिंडे यांच्या शेतात जाऊन पलटी झाला. या ट्रकमध्ये बॉयलरचे लोखंडी ड्रम होतेेे. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रयत’ ची विधानसभेला धडक निपाणीत चाबूक मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *