
धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी (ता.16) हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली होती. यानिमित्त विविध मंडळे, ट्रस्ट आणि मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक मंदिरात ’एक मुखाने बोला, जय जय हनुमान’चा गजर सुरू होता. दिवसभर शहर आणि उपनगरात असलेल्या हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
दोन वर्ष कोरोना महामारीमध्ये गेल्यानंतर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात सण, उत्सव शहरात साजरे केले जात आहेत. गुढीपाडवा, रामनवमी, भगवान महावीर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केल्यानंतर शनिवारी (ता. 16) हनुमान जयंती देखील उत्साहात साजर करण्यात आली.
हनुमान जयंती निमित्त शहर आणि उपनगरातील मंदिरावर रंगरंगोटीसह आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती.
येथील साखरवाडी वरील पुरातन हनुमान मंदिरात सुरेश बोरगावे यांच्या हस्ते मूर्तीची पूजा झाली. त्यानंतर शोभा साळुंखे, सुवर्णा जाधव, सुषमा कोले, रुपाली पोवार, सुगंधा साळुंखे यांच्यासह महिलांनी पाळणा सादर करून पुष्पवृष्टी केली. यावेळी राजकुमार सावंत, सचिन पोवार, ओंकार लोहार, करण साळुंखे, राजू निकम, बाबासाहेब येरूडकर, दिगंबर कुंभार, शिवाजी साळुंखे, सुरेश बाबर, अतुल चावरेकर अजित कोले, आदेश कुंभार, दिगंबर कुंभार ऋषी सूर्यवांशी, संतोष निकम, विनायक इंदलकर यांच्यासह भाविक उपस्थित होते. सुंठवडा वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
येथील प्रगती नगरमध्ये आयोजित हनुमान जयंती कार्यक्रम प्रसंगी चंद्रशेखर हिरेमठ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर महिलांनी पाळणा सादर केला. यावेळी बाबुराव मलाबादे, मल्लिकार्जुन हिरेमठ, यशस्विनी हिरेमठ, लता हिरेमठ, शिल्पा मलाबादे, श्रुती पाटील, चिन्मय मलाबादे, अंजना दुधाने, राजश्री हजारे, शिवानी मलाबादे, धनश्री मलाबादे, श्रुती पाटील, राणी पाटील, ऐश्वर्या कुंभार, लक्ष्मी बागलकोटमठ, अमृता दुधाने, शिल्पा घाळी, यशस्विनी हिरेमठ, श्रेया साळुंखे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
येथील शाहू नगरातील पूर्वाभिमूख हनुमान मंदिरात हनुमान जन्म काळ उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे जितेंद्र राजपूत दाम्पत्यांच्या हस्ते हनुमान मूर्तीस अभिषेक घालूनन पूजा करण्यात आली. त्यानंतर शाहूनगर महिला मंडळाच्या सदस्यांनी पाळणा सादर केला. तसेच सुंठवडा वाटप करण्यात आला. तर शुक्रवारी (ता.15) रात्री माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. यावेळी दादासाहेब खोत, विश्वनाथ जाधव, विनायक माने, सिद्धनाथ जाधव, शिवाजी निंबाळकर, शिवाजी जाधव, राहुल जाधव, साहिल निंबाळकर, सागर बोधले, मयूर बोधले, ज्योती रजपूत, वसुंधरा सूर्यवंशी ललिता खोत, वैशाली गुंडाळे, मनीषा अंकोशे, सरिता निंबाळकर, मंगल जाधव, सावित्री माने, अर्चना बोधले, सावित्री माने, वसुंधरा चव्हाण, विमल मोरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
याशिवाय मुरगुड रोड रिक्षा स्टॉप बाल हनुमान मंदिर, पिंपळवृक्ष हनुमान मंदिर आणि शहरातील विविध हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta