
राजू पोवार : सुळगाव येथे रयत संघटना शाखा उद्घाटन

कोगनोळी : सध्या राजकीय स्वार्थासाठी विविध पक्ष घरा-घरांमध्ये, धर्मा-धर्मामध्ये, जाती-जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर हा प्रकार रयत संघटना खपवून घेणार नाही. रयत संघटनेचे सर्व मावळे कोणत्याही सत्तेला किंवा आमिषाला कधीही बळी पडणार नाही. कारण आमच्यामध्ये नैतिकता आहे. हीच नैतिकता रयत संघटनेला पुढे घेऊन जाईल. महापूर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिक, शेतकऱ्यांचा योग्य पंचनामा करून नुकसान भरपाई योग्य मिळाली पाहिजे, यासाठी रयत संघटना असून जर ही भरपाई न मिळाल्यास ती मिळवून देण्याची ताकत ही रयत संघटनेतच आहे. असे मनोगत चिक्कोडी रयत संघटना जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
सुळगांव तालुका निपाणी येथे रयत संघटनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महादेव शेळके हे होते. स्वागत भिकाजी कांबळे यांनी तर प्रास्ताविक शक्ती कांबळे यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजू पोवार, रयत संघटना युवा अध्यक्ष बाळासाहेब हदीकर यांच्यासह उपस्थित रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
रयत संघटनेचे युवा अध्यक्ष बाळासाहेब हदीकर, रमेश पाटील, उमेश भारमल, भगवंत गायकवाड, सदाशिव पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुळगांव शाखाध्यक्ष संजय पोवार, उपाध्यक्ष दामोदर कांबळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत सुतार, सेक्रेटरी चेतन पाटील, संतोष कांबळे, मयूर पोवार, अजित नलवडे, आप्पासो कांबळे, विलास कांबळे, दत्तात्रय शेळके, आनंदा पोवार-सावकर, दत्तात्रय कांबळे, गणपती कांबळे, निलकंठ गोरडे, चंद्रकांत पोवार, संजय कांबळे, महादेव विटे, आनंदा नलवडे, सुहास पाटील, तानाजी पोवार, सखाराम पाटील, आनंदा नलवडे, भाऊसो कांबळे, अशोक कांबळे, नेताजी कांबळे, सोहम पाटील यांच्यासह परिसरातील रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta