युवा नेते उत्तम पाटील : शिरगुप्पीत विविध कामांचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : बरीच वर्षे राजकारणातील विविध पदे भुषवूनही अजूनही दुर्गम भागातील पाणी, रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा भागातील नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही वास्तू स्थिती असताना लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पण आपल्याकडे कोणतीही सत्ता नसताना सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. यापुढील काळातही दुर्गम भागातील विकास कामे करण्यासाठी आपण तत्पर आहोत, असे मत बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
युवा नेते उत्तम पाटील यांच्या पाठपुराव्याने विधानपरिषदेचे माजी आमदार विवेकराव पाटील यांच्या फंडातून शिरगुप्पी येथे सिमेंट काँक्रेट रस्त्यासाठी 5 लाखांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करून ते बोलत होते.
वेळेस ग्रामपंचायत अध्यक्ष आनंदा कुंभार, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र देसाई, सुनील हजारे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अरुण जाधव, अमोल शेंडे, संदीप डाफळे, एल. जी. हजारे, आनंद खराडे, माजी सदस्य श्रीकांत डाफळे, माजी उपाध्यक्ष विकास डाफळे, बाळासो जाधव, गणपती सूर्यवंशी, मछिंद्र चौगुले, संजय माने, विनय पोवार, रामचंद्र काळे, संजय चव्हाण, संतोष हजारे, विनायक मोकाशी, मारुती महाकवी, सचिन रायमाने, प्रा.सुरेश चव्हाण, भैय्या मांडगे, चंद्रकांत कुंभार, हिंदुराव कुंभार, विष्णू म्हाकवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …