कोगनोळी : येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे.
कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणार्या प्रभाग क्रमांक आठ मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गेल्या अनेक दिवसापासून गटारीचे पाणी, कचरा तुडुंब भरून राहिला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आंबेडकर नगर मध्ये असणार्या मुख्य गटारीमध्ये कचरा साचला आहे. पाण्याचा विसर्ग पुढे होत नाही. जागच्या जागी पाणी थांबून त्यामध्ये जीवजंतू डास होऊन रोगराईला आमंत्रण मिळत आहे.
यामुळे येथील राहणार्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील नागरिकांच्या मागणीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील गटारीचे पाणी जवळच असणार्या शेतकर्यांनी शेताच्या बाजूने असणार्या वगळीतून जाऊ देत नसल्याने याठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. अडवलेले पाणी अनेक लोकप्रतिनिधी यांना दाखवून होणारा त्रास जाणवून दिला आहे. कोगनोळी ग्रामपंचायतीला देखील अनेक वेळा लेखी निवेदन देऊन कळवले आहे. पण याच्यावर उपाय काहीच होताना दिसत नाही. जाणून बुजून आंबेडकर नगर दलित वस्ती म्हणून नजरेआड केलं जात आहे की काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …