Saturday , December 13 2025
Breaking News

निपाणीत पहिल्यांदाच महिलांना उद्घाटनाचा मान

Spread the love
निपाणीत ‘नरेंद्र चषक’ फुटबॉल स्पर्धा ; दिवंगत नितीन शिंदे यांची जयंती
निपाणी( वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारी शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी धनश्री शिंदे, सुनीता शिंदे, वैशाली शिंदे, शोभा साळोखे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. निपाणी फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटनाचा मान देऊन अनोखा पायंडा पाडण्यात आला.
प्रारंभी सचिन फुटाणकर यांनी स्वागत तर सारंग देसाई यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर दिवंगत नितीन शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी सुधाकर सोनाळक यांनी मनोगत व्यक्त केले.
पहिला सामना रायझिंग स्टार क्लब विरुद्ध साखरवाडी एफसी संघात झाला. साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार असून विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेमध्ये स्थानिक पातळीवरील सहा संघांचा सहभाग राहणार आहे. त्यामध्ये जत्राटवेस टीम लोकेश, छत्रपती शिवाजी चौकातील रायझिंग स्टार क्लब, साखरवाडी तील फुटबॉल क्लब, दिवंगत विश्वासराव शिंदे शिवछत्रपती तरुण मंडळ, महादेव गल्लीतील एस. पी. ग्रुप आणि शिवाजी नगरातील छावा ग्रुप संघाचा समावेश आहे.
दिवंगत नितीन शिंदे यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिंदे परिवारातर्फे या स्पर्धांचे आयोजन केले जाणार असल्याचे ओंकार शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमास राहुल शिंदे, प्रतीक शहा, तुषार शिंदे, सोमनाथ शिंदे, अरुण वैद्य, वीरेंद्र येडूरे, आनंद परीट, गजेंद्र तारळे, अमर बिल्ले, संतोष पोळ, निवास पाटील, सुरेंद्र कागे, इंग्रजीत बगाडे, मधुकर खवरे, नितीन साळुंखे, चंद्रकांत दळवी, आकाश खवरे, विजय साळुंखे, रणजीत माने, चंद्रकांत दळवी, जॉन मधाळे, प्रशांत आजरेकर, गणेश घोडके, अतुल चावरेकर यांच्यासह निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रयत’ ची विधानसभेला धडक निपाणीत चाबूक मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *