निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचा १३ वा वर्धापनदिन रविवारी (ता. २९) उत्साहात पार पडला. त्यानिमित पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये निपाणी येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील उद्योग भवन समोरील नष्टे लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पत्रकार आणि उद्योजकांचा गौरव करण्यात आला.
पत्रकार राजेंद्र हजारे हे गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारितेत आहेत. आजतागायत त्यांनी विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात लिखाण केले आहे. निपाणी व परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. आपल्या बातम्यांमधून अनेकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी अशोकराव भंडारे, दिलीप पवार, ऍड. संजय पवार, राहुल चव्हाण, गणेश माळी, उदय पाटील, संजय वाघ, संजय मोरे, उदय बेलवलकर, दत्ता मानवी, जावेद देवडी, अजय शिंगे, रत्नदीप चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta