Sunday , September 20 2026
Breaking News

शहीद प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love

शहिद जवानाच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम, विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये सैन्याच्या वाहनाला एक भीषण अपघात झाला. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक थेट नदीत कोसळा. त्यात एकूण 7 जवान शहीद झाले होते.या अपघातात साताराचे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या भारतीय लष्करातील जवान प्रशांत जाधव यांच्यावर आज त्यांच्या बसर्गे या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद प्रशांत जाधव यांना श्रद्धांजली देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. दरम्यान गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे या गावांनाही आता विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय घेतलाय. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या अंत्यसंस्कारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आज अंत्यसंस्कारानंतरही प्रशांत जाधव यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम राहिलंय.

आज सकाळी आठ वाजता विशेष विमानानं त्यांचं पार्थिव बेळगाव विमानतळावर आणण्यात आलं, तेथून हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. शहीद जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बसर्गे सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान त्यांचं पार्थिव घरी आणल्यानंतर पत्नी आणि आई-वडिलांनीच केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या अंत्ययात्रा मार्गात ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत त्यांना अभिवादन केलं. लडाखमधील या अपघाताने देशाचं कधीच भरून न निघणारे नुकसान केले आहे. मात्र या जवानांचं हे बलिदान देश कधीच विसरणारही नाही.

About Belgaum Varta

Check Also

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये भीषण आग; तीन नवजात बालकांचा मृत्यू

Spread the love  अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *