गावामध्ये हळहळ
निपाणी : सर्पदंश झाल्याने लखनापूर येथील सर्प मित्राचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.2) उघडकीस आली आहे. आनंदा पांडुरंग पोवार (वय 25) असे या सर्प मित्राचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आनंदा पवार हा लखनापूर आणि परिसरात सर्पमित्र म्हणून कार्यरत होता. शेतीवाडी इतर ठिकाणी तो काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. लखनापूर गावात काम करत असताना त्याला 30 रोजी विषारी सर्पाचा दंश झाला. तात्काळ त्यांना निपाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार सुरू असतानाच प्रकृती साथ न दिल्याने त्याचा अखेर गुरुवारी (ता.2) मृत्यू झाला. त्याच्या मागे आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात येत होती.
Belgaum Varta Belgaum Varta