Thursday , June 4 2026
Breaking News

विवाहितेचा विष देऊन खून

Spread the love

कुटुंबियांचे तहसीलदारांना निवेदन : फाशी देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : येथील शिवाजीनगर येथे राहणारे विनोद सखाराम मातीवड्डर (जोत्रे) यांनी आपली मुलगी अर्चना हिचा विवाह 2018साली अंधेरी व गोरेगाव येथे वास्तव्यास असणार्‍या शकुंतला मारिया कुशाळकर त्यांचा मुलगा महेश कुशाळकर यांच्याशी विवाह लावून दिला होता. सहा महिने संसार सुरळीत चालू होता. मात्र त्यानंतर महेश हा काही काम धंदा करत नसल्याने पैसे व सोन्यासाठी अर्चना हिचा छळ चालू केला. सासू, विवाहित नणंद आशा धोतरे राहणार जोगेश्वरी पूर्व या वारंवार घरी जावून अर्चना हिचा बारीक सारीक कारणासाठी तसेच तुझ्या आई-वडिलांनी काही शिकवले नाही, तुला जेवण येत नाही, लग्नात काही सोने-नाणे दिले नाही म्हणून शारीरिक व मानसिक छळ करू लागल्या, त्यानंतर 26 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता नवरा, सासुद, नणंद यांनी पुन्हा अर्चना हिला मारहाण करून बळजबरीने विष पाजले व कोंडून ठेवले. अंगात विष भिणून बेशुद्ध पडल्यानंतर अर्चना हीला दवाखान्यात नेण्याचा बनाव करण्यात आला. दुसर्‍या दिवशी सकाळच्या सुमारास अर्चना हिचा मृत्यू झाला. लग्नासाठी मध्यस्थी करणारे एजंट संतोष कृष्णा मातीवड्डर तसेच त्यांची पत्नी व नणंद शोभा सौरभ जोत्रे, सौरभ जोत्रे, यांनीही तिला फोन करून घरी जाऊन वारंवार त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सर्वाच्या मोबाईल डिटेल्स तपासून सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी कळकळीची विनंती निवेदनाद्वारे वडिलांनी व नातेवाईकांनी दिली आहे.
या निवेदन प्रसंगी नगराध्यक्ष जयवंत भाटले, भाजप शहराध्यक्ष प्रणव मानवी, नामदेव मातीवड्डर, संजय मातीवड्डर, दत्तात्रेय जोत्रे, आनंदा मातीवड्डर, चन्नाप्पा कलकुटगी, चंद्रकांत कलकुटगी, मनोहर माती वड्डर, राजाराम कलकुटगी, अभिजीत मातीवड्डर, अनिल कलकुटगी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत इंटरनेट सेवेची गती मंदावल्याने आधार कार्डासह उतारे मिळविण्यासाठी धावपळ

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद पडल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *