Thursday , September 19 2024
Breaking News

श्रावणी भिवसेने स्केटिंगमध्ये केली धमाल

Spread the love

दौलतराव पाटील फाऊंडेशनतर्फे सत्कार : 70 पेक्षा अधिक मिळविली पदके
निपाणी (वार्ता) : जिद्द व चिकाटीच्या जोरावर श्रावणी भिवसे या विद्यार्थिनीने वयाच्या अवघ्या दहा वर्षांमध्ये स्केटिंग या क्रीडा प्रकारांमध्ये 70 हून अधिक पदके पटकावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकचे औचित्य साधून येथील दौलतराव सोशल फाऊंडेशन व जायंटस् ग्रुप ऑफ निपाणी यांच्यामार्फत श्रावणीचा सत्कार समारंभ पार पडला.
श्रावणी ही निपाणी येथील केएलई सीबीएसई स्कूल येथे चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. तिने 2019 मध्ये ’एक भारत श्रेष्ठ भारत’ 96 तास सलग स्केटिंग करून 2027 किलोमीटर स्केटिंग केले.
ग्लोबल रेकॉर्ड, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड, एक्सट्रीम रेकॉर्ड, बेस्ट इंडिया रेकॉर्ड, इंडियन अचीवर बुक ऑफ रेकॉर्ड, अशियन पॅसिफिक रेकॉर्ड करून निपाणीचा नाव लौकिक करण्याचा मोलाचा वाटा चिमुकलीने उचलला आहे.
तालुका, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग या प्रकारांमध्ये सहभाग घेऊन आजपर्यंत या चिमुकलीने सुवर्णपदक रौप्य पदक व कांस्यपदक असे एकूण 70 पेक्षा अधिक पदक पटकावल्या बद्दल तिचा दौलतराव सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष संयोगीत पाटील, जायंट्स ग्रुप ऑफ निपाणीचे अध्यक्ष गंगाधर मगदूम, स्वामी समर्थ सर्विसिंग सेंटरचे शैलेश मल्लाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संयोगित पाटील यांनी, जिद्द व चिकाटीच्या जोरावर कोणत्याही स्तरावर आपण पोहोचू शकतो. फक्त आपली प्रामाणिक इच्छा व दररोज मेहनत करणे गरजेचे असते. त्याचबरोबर शैक्षणिक शिक्षणाबरोबर मैदानी खेळ जोपासणे व निरोगी व सुदृढ जीवन जगणे काळाची गरज बनत चाली आहे. यापुढील काळामध्ये श्रावणीला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही सहाय्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी सुरेश घाडगे, स्वप्निल पावले, विक्रांत पावले, हिमांशू पाटील, बाबासाहेब मगदूम, सचिन परमने, अभिजीत जिरगे, आदर्श भोईटे, वसंत धारव, महादेव मल्लाडे, बाळासाहेब परीट, राजू अलकनुरे, नारायण यादव, विक्रांत पावले, आकाश मल्लाडे, संदीप भोईटे, स्केटिंग प्रशिक्षक अजित शेलार, महेश भिवसे, श्रीदेवी भिवसे विलास जगजंपी, शारदा पाटील यांच्यासह फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. बबन निर्मले यांनी सूत्रसंचालन केले. सागर पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान

Spread the love  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *