कोगनोळी : येथील प्रजावणी फाऊंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी नारायण बिरू कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावणी फाऊंडेशन व सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने धनगर समाज सामुदायिक भवन येथे सर्व आजारावरील आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
शिबिरात, कोगनोळी पंचक्रोशीतील 166 नागरिकांनी सहभागी होऊन तपासणी करुन घेतली.
अरुण पाटील यांनी स्वागत तर लक्ष्मण जगताप यांनी प्रास्ताविकात नारायण कोळेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.
दीपप्रज्वलन, सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी शांतिनाथ पालकर, ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत, कृष्णात खोत, विठ्ठल मुरारी कोळेकर व मान्यवरांच्या हस्ते केले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सलीम मुजावर यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी अॅड. सयाजी पोटले होते.
यावेळी अॅड. सयाजी पोटले, नितीन कानडे यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासो कोळेकर, डॉक्टर अण्णासाहेब चौगुले, प्रकाश गायकवाड, मारुती कोळेकर, तात्यासो कागले, कुमार पाटील, अमोल पोवाडे, युसूफ खान यांच्यासह प्रजावाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी, आशा कार्यकर्त्या, परिचारिका, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
सुत्रसंचालन राहुल गायकवाड यांनी तर आभार सचिन परीट यांनी मानले.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …