निपाणी शिवसेनेचे पत्रक : प्रसंगामध्येही सावरले राज्याला
निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापत चालले आहे. तरीही सीमाभागातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे पत्रक बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब तांबे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकातील माहिती अशी, कांही स्वार्थी मंत्र्यांच्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होत आहे. हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण म्हणजे शिवसेनेमध्ये सर्वात मान व पद असेल तो शिवसैनिक व जिल्हा प्रमुख मान दिला जातो. मुळातच शिवसेनेमध्ये 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करा अशी शिकवण बाळासाहेबांनी प्रत्येकांना घालून दिले आहे. पण आता कांही शिदे यांच्यासारख्या मंत्र्यांना पैशाची व पदाची ओढ लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे.
2004 मध्ये शिवसेना भाजप स्वतंत्र निवडणूका लढले होते. पण त्यावेळी भाजपचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेच्या कोणत्याही आमदारांनी त्यावेळी एक दोन पद सोडली तरी सर्व सत्ता ही भाजपकडे होती. त्यावेळी ही शिवसेनेला त्रास सहन करावा लागला. त्याचे पुनरावृत्ती म्हणून 2019 ला शिवसेना भाजप युती करुन लढले. पण त्यावेळी भाजपात हेकेकोरपणामुळे शिवसेना भाजपपासून वेगळी झाली. तीन चाकाची गाडी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस बरोबर सरकार निर्माण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे निश्चित झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद घ्यावयाचे होते. पण तीन पक्षाचे सरकार त्यामध्ये एकनाथ शिंदेच्या तोडीच्या इतर दोन पक्षाचे लोक होते. म्हणून सरकार चालणार नाही. म्हणून उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची सुत्रे देण्यात आली. त्यानंतर काळात दोन ते अडीच वर्षे कोरोना, महापुर चक्रीवादळमध्ये मोठे प्रसंग उध्दव ठाकरेंना भेडसावत होते. तरीही उध्दव साहेब न घाबरता त्या प्रसंगांना तोंड देत महाराष्ट्र सावरला. त्यामध्ये देशातले एक नंबर मुख्यमंत्री त्याची ख्याती झाली. त्याची पोटशुळ भाजपला झाली. तरीपण शिवसेना हा एक पक्ष बाळासाहेबांनी काठ्या लाठ्या खावून तयार झालेला पक्ष आहे. शिवसैनिक शिवसेनेचा कणा आहे. त्यामुळे असे किती मोठे मंत्री भुजबळ, राणे, राज ठाकरे अशी अनेक सोडून गेले. तरी पण शिवसेना मोठ्या जोमाने उभारली. राज ठाकरे गेल्यावर स्वत: उध्दव ठाकरे यांनी 63 आमदार निवडून आणले होते. त्यामुळे आज किती आमदार, खासदार आले गेले हे शिवसेनेला फरक पडत नाही. जे गेले ते कावळे होते. जे राहिले ते खरे मावळे आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी सीमावासीय खंबीरपणे उभे आहेत.
