Wednesday , March 4 2026
Breaking News

सत्ताधारी गट गावच्या विकासासाठी प्रयत्नशील

Spread the love

पंकज पाटील : शाळा खोलीचा शुभारंभ
कोगनोळी : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गट कायमपणे प्रयत्नशील आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी गटारी साफ करणे, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युत बल्ब यासह अन्य कामे करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी हालसिद्धनाथ नगर येथील सरकारी प्राथमिक शाळेतील खोली पावसामुळे कोसळली होती. यामुळे येथील विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला होता. गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एनआरजी योजनेच्या निधीतून सहा लाख तीस हजार रुपये मंजूर करुन शाळा खोलीचा बांधकाम शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या कामाकडे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष देऊन काम करावे, असे मनोगत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे हालसिद्धनाथ नगर शाळा खोली बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
पुनम उर्फ ज्ञानेश्वर डांगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
तत्पूर्वी येथील महिला शिक्षिकांनी हळदी कुंकू लावुन पुजा केली.
माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, संजय पाटील, युवराज कोळी, ग्राम पंचायत सदस्य महेश जाधव, एसडीएमसी अध्यक्ष नवलाप्पा गोरडे यांनी श्रीफळ वाढवले. ग्राम पंचायत सदस्य राजू शिंत्रे, रामचंद्र गाडेकर, बुद्धिराज घस्ते आदींनी कुदळ मारुन शुभारंभ केला.
यावेळी माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर डांगरे यांच्या हस्ते पंकज पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, बशीर गडवाले, जहांगीर कमते, प्रवीण भोसले, विनायक आवटे, रोहीत माणकापुरे, प्रवीण जाधव, राहुल चव्हाण, मुख्याध्यापिका देवदास यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा सुधारणा समितीचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगावमधील हावले कुटुंबीयांचे आधारवड नरसू हावले यांचे निधन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, श्री. सिद्धेश्वर क्रेडिट संस्थेचे संस्थापक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *