निपाणी : टार्गेट करून अवघ्या चारच दिवसांत एकाच घरात दोनदा चोरी करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. ही घटना निपाणीतील शाहुनगरात उघडकीस आली आहे.
निपाणी शहरातील शाहूनगर या उपनगरात एकाच घरात 4-5 दिवसांत दोनदा चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गौरी-गणेश सणासाठी घरातील लोक परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी या घरात घुसून 10 हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता. त्यानंतर 4-5 दिवसांतच घरातील लोक कोल्हापुरात शिकणार्या मुलाला भेटण्यासाठी गेले असता, काल सायंकाळी 6.30 ते 7.30 या वीज पुरवठा बंद असण्याच्या काळात चोरट्यांनी छतावरून घरात प्रवेश करून 3 तोळ्यांचे गंठण, अर्ध्या तोळ्याच्या 2 अंगठ्या, दीड तोळ्यांची चेन असे सोन्याचे दागिने आणि देवघरातील पूजेचे चांदीचे साहित्य असा किंमती ऐवज लांबवला. घरमालक शशिकांत ईश्वर तोडकर काल सायंकाळी 8.30च्या सुमारास घरी परत आले असता, घरात पुन्हा चोरी झाल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी तातडीने निपाणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. निपाणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …