राजेंद्र पवार यांचा आरोप : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : बेडकिहाळ साखर कारखाना परिसरातील भोज – गळतगा-नेज या गावांना जोडणारा सर्वात महत्वाचा भोज क्रोस सर्कल च्या सर्वांगीण विकासाठी कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने पीडब्ल्यूडी व पीआरएएमसी योजनेतुन १ कोटी ७५ लाखाचा भरीव निधी मंजूर करण्यात आले असून या कामाचा शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ मार्च २०२१ रोजी भोज क्रॉस परिसरात करण्यात आला होता. पण या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष न दिले गेल्याने तब्बल एक वर्ष तीन महिने ओलांडले तरी याकामाला अद्याप सुरवात झालेली नाही. यासाठी मंजूर झालेले १ कोटी ७५ लाखाचा हा निधी गेला कुठे? असा गंभीर आरोप भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार – वड्डर यांनी केला आहे.
ते म्हणाले, भोज क्रॉस हा तीन गावांना जोडणारा मोठा क्रॉस आहे. या ठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ होते. शिवाय या परिसरात साखर कारखाने, डिस्लेरी सारख्या अनेक कारखाने असल्याने हा परिसरात वाहतुकीला मोठा अडचण निर्माण होत असून याची दाखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्यासह पीआरएएम योजनेतून १ कोठी ७५ लाखाचा निधी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करून कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला होता. या निधीतू भोज क्रॉस च्या मध्य भागापासून सुमारे ६० फूट गोलाकार असे सर्कल करून त्या मध्ये रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात येणार होते. शिवाय बेडकिहाळ, गळतगा व भोजकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे १०० मीटर पर्यंत रस्ता डांबरीकरण करून सर्व ठिकाणी रिप्लेक्टर, दिशा दर्शक फलक लावण्यात येणार होते. सदर काम कंत्रादार बी के मटगार हे करणार असल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते. पण मध्यन्तरी लॉकडाऊन झाल्याने सदर काम झाला नसेल. हे मात्र खरं आहे पण लॉकडाऊन कार्यकाळ संपून आज सुमारे कित्येक महिने तरी ओलांडले असते.
भोज क्रॉस जवळ साखर कारखाना येतो. गळीत हंगामात या परिसरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होते. या मुळे या ठिकाणी कोणतीच विकास कामे होण्यास विलंब होतो. शिवाय आत्ता गळीत हंगाम देखील संपून अनेक महिने झाला. मग हे काम कधी पूर्ण होणार हे मात्र आत्ता सार्वजनिक बांधकाम विभाग व समंधित कंत्राटदारच सांगितले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केवळ विकासकामांचा श्रीफळ फोडून शुभारंभ करून सार्वजनिकांचे दिशाभूल केले आहेत.
याच दरम्यान अक्कोळ येथील बाळोबा माळ परिसरातील सर्कल सीशोभीकरण कामाचा शुभारंभ करून ते काम उत्कृष्ट व दर्जेदार पने पूर्ण करण्यात आला आहे. मग भोज क्रॉस मधील हे काम तब्ब्ल एक वर्षे ओलांडली तरी का होत नाही. याचा विचार लोकप्रतिनिधींनी करून अधिकारी वर्गांची कसून चौकशी केले पाहिजे.
या परिसरात ऊस वाहतुकीच्या कोंडीमुळे या ठिकाणी अनेक लहान मोठी अपघात घडले आहेत. तेव्हा लवकरात लवकर या भोज क्रोस सर्कलचा शुशोभीकरण कामासाठी जागेची सर्व्हेकरून कामाला सुरवात करावी व याचा पाठ पुरावा या भागातील लोक प्रतिनिधींनी करावा अन्यथा अधिकारी वर्गांची चौकशी केली जाईल अशा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्ग व कंत्राटदारांना राजेंद्र पवार यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta