Saturday , April 18 2026
Breaking News

’आतापर्यंत तुम्ही 9 सरकारे पाडली, हा विक्रमच’, तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Spread the love

हैद्राबाद : : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक यावेळी हैदराबादमध्ये होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित 19 राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन करत शक्ती प्रदर्शन केलेय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नऊ राज्यातील तुम्ही सरकारं पाडत एक प्रकारे विक्रमच केलाय, अशी बोचरी टीका के चंद्रशेखर राव यांनी केली. तसेच केंद्र सरकारने आश्वासने पूर्ण न केल्यामुळे प्रश्नचिन्हही उपस्थित केले.
के. चंद्रशेखर राव यांच्याकडून नियमांचं उल्लंघन
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे स्वागत केले. दुसरीकडे ते विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत न करत त्यांनी शासकीय शिष्टाचारचं उल्लंघन केल्याचं म्हटले जातेय.
यशवंत सिन्हा यांचं कौतक
तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी विरोधीपक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचं कौतक केलं. ते म्हणाले की, ’दोन्ही उमेदवाराची तुलना करायला हवी. तुमच्या विजयाने देशाची मान उंचावेल. आज देशात अनेक चुकीचे विषय आणि घटना घडत आहेत. परिवर्तनासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.’
पंतप्रधान सरकारे पाडण्यात व्यस्त
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त आहात. आतापर्यंत तुम्ही नऊ सरकारे पाडली आहेत. तुम्ही हा एक विक्रमच केलाय.

About Belgaum Varta

Check Also

२५ भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीत उलटली; १० ठार

Spread the love  मथुरा : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी मोठा अपघात झाल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *