Sunday , September 20 2026
Breaking News

संकेश्वरात बेंदुरनिमित्त तयार बैलजोडी स्पर्धेचे भव्य आयोजन.

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बेंदूर कमिटीतर्फे येत्या १२ जुलै २०२२ रोजी बेंदूरनिमित्त हुक्केरी तालुका स्तरीय आणि संकेश्वर शहर स्तरीय तयार बैलजोडी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संकेश्वर श्री महालक्ष्मी मंदिर आवारात १२ जुलै रोजी दुपारी १२ ते ४ वाजता स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेला दिव्य सानिध्य निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे लाभणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन बेंदूर कमिटीचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी यांचे हस्ते केले जाणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज बस्तवाडी, पैलवान अप्पासाहेब कर्देण्णावर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, गंगाधर बोरगल्ली, मारुती गस्ती, काडेश बस्तवाडी, रामू काकोळी, अनिल खातेदार, कुशेंद्र मरडी, आकाश खाडे, प्रदीप कर्देगौडा यांचेशी संपर्क साधावयाचा आहे. स्पर्धेत भाडोत्री बैलजोडी आढळून आली तर ती बाद ठरविली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली स्पर्धा होऊ शकली नव्हती यंदा स्पर्धा होत असल्याने त्याची जय्यत तयारी केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *