निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी निवडणूक घेवून जनरल सेक्रेटरी व सहाय्यक जनरल सेक्रेटरी यांची निवड करण्यात आली. ६ वी ते १० वीच्या एकुण ४०० विद्यार्थ्यांचा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता. निवडणुकीची प्रक्रिया कशी होते, त्याचे नियम काय असतात, याची माहिती देवून निवडणूक प्रक्रिया कशी चालविली जाते, याचे प्रात्यक्षिकरित्या अनुभव देण्यात आले. १० वीचे नऊ विद्यार्थी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहिले होते. त्यापैकी सोनाली पाटील हीला जनरल सेक्रेटरी म्हणून निवडण्यात आले. तर कार्तिक पाटील याची सहाय्यक जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाली. विदयार्थ्यांनी आधारकार्ड दाखवून नियमानुसार ही निवडणूक पार पडली. निवडीनंतर विजयी उमेदवारांच्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, प्राचार्या स्नेहा घाटगे व सर्व शिक्षकांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta