कोगनोळी : पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठोबा दर्शनासाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील शेकडो भाविक मंगळवार दि. 5 जुलै रोजी बसने रवाना झाले.
येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिराजवळ बापूसाहेब पिडाप पाटील व बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते बसचे विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना बापूसाहेब पाटील म्हणाले, कोगनोळी वारकरी व भाविकांच्या वतीने पंढरपूर येथे जागा घेण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व भाविक व देणगीदार यांच्या सहकार्यातून भव्य असे भवन बांधण्यात येणार आहे. पंढरपूर येथील भवन निर्मिती झाल्यास परिसरातील भाविकांना पंढरपूर येथे राहण्यासाठी मोठी सोय होणार आहे. प्रतिवर्षी परिसरातून शेकडो भाविक आषाढी एकादशी व माघ वारी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. यावर्षीही शेकडो भाविक विठ्ठल दर्शन घेणार आहेत.
यावेळी केके बेकर्सचे मालक किरण जाधव, आनंदा डोंगळे, शिवाजी माने, सुरेश पाटील कापशीकर यांच्यासह अन्य भाविक भक्त, वारकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta