प्राचार्य डॉ. शाह : देवचंदमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
निपाणी (वार्ता) : भारतीय परंपरेत गुरु – शिष्य नात्याला अनन्य साधारण महत्व आहे. शिष्याला आपले जीवन सुखी – समृद्ध बनवायचे असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणे आवश्यक आहे. गुरू शिवाय जीवनात इच्छित ध्येय गाठणे अशक्य आहे, असे मत प्राचार्य पी. पी. शाह यांनी व्यक्त केले.
अर्जुन नगर येथील देवचंद कॉलेज (कनिष्ठ विभाग) यांचा वतीने आयोजित गुरु पोर्णिमा कार्यक्रमात प्राचार्य डॉ. पी. पी. शाह अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाची वाटचाल करत असताना असंख्य अडचणी येतात. त्यावेळी मार्गदर्शनाची नितांत गरज असते. गुरू हा अनुभव सिद्ध असतो. जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ही विशाल असते. परिणामी विद्यार्थ्यांना दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करू शकतात. विद्यार्थ्यांनी अध्यात्म, मनशांती कडेही थोडे पहावे. त्यामुळे जीवनामध्ये अंतिम स्वप्न साकार होण्यास मदत होईल.
उपप्रापर्य एस. जी. कागवाडे यांनी, गुरूंचे महत्व विषद केले. तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. यु. घटेकरी यांनी विद्यार्थ्यांनी भावी जीवनात उत्तुंग यश मिळवून जीवन सफल बनवावे असे सांगितले.
स्वागत संकेत काळे यांनी स्वागत केले. सोनाली शेलार, दिक्षा कंबळे, मृदुला मुरगुडे, इंद्रजित कापडे, समृद्धी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा. वाय. बी. पाटील, पी. बी. पाटील, प्रा. कृष्णामाई कुंभार, प्रा. कल्पना पाटील, प्रा. टी. ए. पाटील, प्रा. व्ही. व्ही. पाटील, प्रा. एन. डी. कुंभार, प्रा. विकास माने. प्रा. निरंजन जाधव, प्रा. साळुंखे उपस्थित होते.