कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीकडून प्रभाग क्रमांक एक ते दहा मधील गटारीची स्वच्छता करण्यात येत आहे. गटारीची स्वच्छता करून घेत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून गावातील गटारी स्वच्छ करण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. ग्रामपंचायत अध्यक्षा छाया पाटील यांनी तात्काळ गटारीची स्वच्छता करून घेण्यात यावी अशी सूचना कर्मचाऱ्यांना केली त्याप्रमाणे गटारीची स्वच्छता सुरू झाल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून गावातील मुख्य गटारी सह लहान गटारी मध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य साचले होते. यामुळे रस्त्यावर पाणी येणे यासह अन्य समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन स्वच्छता करून घेतल्याने गावातील गटारी स्वच्छ दिसू लागले आहेत.
यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य प्रितम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी या कामी लक्ष घालून ताबडतोब गटारी स्वच्छ करून घ्याव्यात अशी सूचना दिली होती. यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta