कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे भाविकांच्या सोयीसाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांच्या फंडातून मंजूर झालेल्या यात्री निवासचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
हालशुगरचे संचालक राजाराम खोत यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या फंडातून भव्य असे यात्री निवास बांधण्यात आले आहे. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आप्पाचीवाडी गावासाठी विशेष लक्ष दिले आहे. आतापर्यंत गावामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामे झाली आहे. त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरच पुन्हा त्या आमदार होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, मतदार संघातील जनतेच्या सोयीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहे. निपाणी मतदार संघामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामे केली आहेत. कर्नाटक राज्यात निपाणी मतदारसंघ आदर्श मतदारसंघ बनवण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील, निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, ग्रामपंचायत अध्यक्षा शालन चव्हाण, उपाध्यक्ष आनंदा कुवाळे, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक प्रकाश शिंदे, एसडीएमसी उपाध्यक्षा नंदिनी मेथे, ग्रामपंचायत सदस्या मंगल जाधव, ग्रामपंचायत उपाध्यक्ष आनंदा कुवाळे, सह्याद्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष के बी माने, आनंदा यादव, माजी सैनिक शिवगोंडा पाटील, राजाराम पाटील, राजेश डोंगळे, धनाजी पाडेकर, डॉक्टर जयसिंग मोरे, विश्वास आबणे, केरबा पाटील, रणजीत माने, अमोल काळे, सर्जेराव हेलाटे, सोहन खोत, कृष्णात पोटले, ए जी माने, बापूसो पुजारी, विनोद माने, संजय कोकणे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta