अशोक भटकर : निपाणीत आदर्श शिक्षकांचा गौरव
निपाणी : सर्वसामान्य बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी अंगावरती चिखल, माती, शेण अंगावरती टाकून एका नवीन युगांताची सुरुवात करणारी एका उज्वल पिढी घडवणारी कार्य करणारी माता म्हणजे सावित्रीबाई फुले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर यांनी केले.
येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रोपाला पाणी घालूनन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रणजीत माळगे यांनी स्वागत केले.
बेळगाव जिल्ह्यातील आदर्श शिक्षक आणि शिक्षिका यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. या आदर्श शिक्षक पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, पेन व दोन पुस्तिका होते.
भटकर म्हणाले, सत्य आणि असत्य यांच्यामधील भेद ओळखते हे खरे शिक्षण आहे. समाजाची कल्याण करण्याची तीव्र इच्छा असणे शिक्षण आहे. अशा पद्धतीच्या शिक्षणासंदर्भात व्याख्या महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी केल्या असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास निपाणी क्षेत्र शिक्षणाधिकारी रेवती मठद, महाराष्ट्र राज्य सचिव अर्जुन ओहळ, महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक संतोष कानडे, शांताराम जोगळे, पी. एम. मकानदार, विनायक गुरव, महादेव गोकार, दिलीप उगळे, सुनील शेवाळे, बी. जी. लठ्ठे, जी. एम. कांबळे, दिलीप कांबळे, जावेद पटेल, सदाशिव यलटी, डी. बी. कोरव यांच्यासह बेळगाव, खानापूर, हुक्केरी, चिकोडी, निपाणी, येथील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …