निपाणी (वार्ता) : येथील आंबेडकर नगर मधील अंमलझरी रोड शिवनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या स्वयंभू शिवलिंग मंदिरात श्री च्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. त्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.
मंदिरामध्ये समाधी मठाचे प्राणलिंग स्वामींच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. पहाटेपासूनच श्रीगणेश पूजन व पुराण वाचन पुरोहित महेश यरनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वसंतराव चव्हाण, पांडुरंग चव्हाण, महादेव पाटील, रामदास पोवार, सचिन पोवार, अजित पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा, होम पार पडला. येथील चव्हाण कुटुंबियांनी सदर मंदिर उभारणीसाठी कोणतीही वर्गणी उभी न करता स्वखर्चाने मंदिर बांधले आहे. सोहळ्यास आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मंदिरातील शिवलिंग मूर्तीचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी माजी आमदार सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, नगरसेवक विलास गाडीवड्डर, नगरसेवक डॉ. जसराज गिरे, नगरसेवक संजय पावले, दत्ता नाईक, शौकत मनेर, विलास चव्हाण, अभिजित कौंदाडे, सचिन कौंदाडे, धनंजय खराडे, आप्पासो इंगळे, कृष्णात बाडकर, ओंकार खराडे, सुशांत बुडके, शितल बुडके, धीरज पाटील यांच्यासह समस्त चव्हाण बंधू व गल्लीतील नागरिक उपस्थित होते. यावेळी शेकडो नागरिक व महिलानी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिराच्या मागील बाजूस असलेले लिंबूचे अनेक वर्षापासून वाळलेले झाड मंदिर उभारणी नंतर पुन्हा बहरू लागल्याने भाविकांमध्ये याची चर्चा सुरू होती.
Belgaum Varta Belgaum Varta