नूतन तहसिलदार प्रवीण कारंडे : तहसीलदार पदाचा स्वीकारला पदभार
निपाणी (वार्ता) : जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार येथील तालुका तहसीलदार म्हणून आपली नियुक्ती झाली आहे. यापूर्वी तहसीलदार कार्यालयातील अनुभव असून त्याच्या जोरावर सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिली. त्यांची तहसीलदार पदी नियुक्ती झाल्यानंतर शुक्रवारी (ता.5) त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते.
तहसीलदार कारंडे म्हणाले, कार्यालयात रखडलेल्या कामांना प्राधान्य देणार आहे. कार्यालयीन कामकाज होण्याच्या दृष्टीने सर्व कर्मचार्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत. कामामध्ये दिरंगाई करणार्यांवर कारवाई सुद्धा होणार आहे. तहसीलदार प्रशासनाचे काम नीटनेटके होईल, त्यावर विशेष भर देणार आहे.
यावेळी कार्यालयीन कर्मचार्यांतर्फे नूतन तहसीलदार कारंडे यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास अभिषेक भोंगाळे, अजित देवरुशी, अनिल पोतदार, एस. एस. बेळकुडे, मोबीन सनदी, के. वाय. निडोनी, अजित वांजोळे, अभिषेक गायकवाड, शिरीष पोवार, कल्लाप्पा पुजारी, रमेश हंजी, एल. बी. पुजारी, संतोष गस्ती यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta