निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार कार्यालयात नूतन तहसीलदार म्हणून प्रवीण कारंडे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
राजू पोवार यांनी, निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या विविध समस्या सोडवण्याचे काम रयत संघटनेतर्फे केले जात आहे. आतापर्यंत महसूल प्रशासनाने शेतकर्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सहकार्य केले आहे. यापूर्वी काळातही नूतन तहसीलदारांनी संघटनेच्या कार्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रयत संघटनेकडून येणार्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याशिवाय शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजना पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी भगवंत गायकवाड सर्जेराव हेगडे, भीमराव मलाबादे, कुमार पाटील, कलगोंडा कोटगे, विवेक जनवाडे, तुळशीदास डोंगरे, महेश जनवाडे, नानासाहेब पाटील, महावीर चौगुले, भूषण बुवा, संभाजी साळुंखे, सुभाष देवर्षी, बाळासाहेब खडके, बाळासाहेब पाटील, राजेंद्र कोपार्डे, भरत चेंडके, सुनील गाडीवड्डर, एकनाथ सादळकर,तानाजी जाधव, नामदेव साळुंखे, अनिकेत खोत, संजय जोमा, भरत सुतार यांच्यासह निपाणी शहर व ग्रामीण भागातील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta