Saturday , October 19 2024
Breaking News

हमीभाव ठरविण्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट हवी : राजू पोवार

Spread the love

 

ढोणेवाडीत रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : शेतकर्‍यांना कोणीच वाली नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. त्यांच्यावर नेहमीच अन्याय अत्याचार केला जात आहे. त्यासाठी शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटीत नसल्याने पीकाना हमीभाव दलाला ठरवितो. त्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडत आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी ’कर्नाटक राज्य रयत संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम असल्याचे मत कर्नाटक राज्य रयत’संघटना चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
ते ढोणेवाडी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या 40 व्या शाखेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
कर्नाटक राज्य रयत संघटना जिल्हा अध्यक्ष राजू पोवार, विठ्ठल माळी- महाराज, मनोहर बेनाडे, रमेश पाटील, तानाजी जाधव, एकनाथ सादळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत संघटना नामफलकाचे अनावरण झाले.
मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उमेश भारमल, रमेश पाटील, सर्जेराव हेगडे, भगवंत गायकवाड, सुनील गाडीवड्डर, बबन जामदार, नामदेव साळुंखे, बाबासाहेब पाटील, चिनू कुळवमोडे, सुभाष चौगुले, भरत गेबीसे, जयगोंडा पाटील, राजाराम पाटील, पवन माने, संजय पोवार, तानाजी पाटील, नानासाहेब कुंभार, नानासाहेब पाटील, संजय जोमा, अनिकेत खोत, भरत सुतार, ढोणेवाडी शाखा अध्यक्ष एकनाथ सादळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब खडके, कार्याध्यक्ष सुभाष खोत, सेक्रेटरी राहुल पाटील, सदस्य सोमनाथ परकाळे, शितल सूर्यवंशी, अमोल नागराळे, बाहुबली मेक्कळके, दादासाहेब सादळकर, संजय पाटील, मकबूल जमादार, सदाशिव भेंडे, राजू कोपर्डे यांच्यासह रयत संघटनेचे विविध गावातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. राजेंद्र बेनाडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *