सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात झाला. या वर्षाचे नियोजन करण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला होता.
सर्वप्रथम सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. वाडकर यांनी विद्यालयाच्या सध्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासून अनेकांच्या सहकार्याने हे विद्यालय कसे उभे केले याविषयी सर्व माहिती सांगितली. येथून पुढे अजून कोण कोणती कामे करावयाची व विद्यालयाचा सर्वांगीण विकास कसा करावयाचा याविषयी स्कूल कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले तसेच सदस्य आर. बी. मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. कमिटीचे सदस्य संजय शिंत्रे यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध क्रीडा स्पर्धा विज्ञान प्रदर्शन वक्तृत्व स्पर्धा असे अनेक कार्यक्रम साजरे करून विद्यालयाची स्मरणिका प्रकाशन करण्याचा मानस व्यक्त केला. माजी मुख्याध्यापक बी. जी. खाडे यांनी हे वर्ष साजरे करत असताना नियोजन कसे करावे याविषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमात विद्यालयाचे पहिल्या बॅचचे पहिले येणारे विद्यार्थी व सध्याचे पीएलडी बँकेचे चेअरमन श्री. एस. एस. ढवणे सर यांनी या विद्यालयातील शिक्षकांनी आपल्यावर केलेल्या संस्काराबद्दल ऋण व्यक्त केले त्याचबरोबर अभियंता सुदेश बागडी, संजय पाटील, दादू कोगनोळे, धनाजी भेंडुगळे, भिवशीचे अशोक पाटील, दिलीप वारके, संजय मगदूम, वाळके गुरुजी, संजय कोळी अशा अनेक मान्यवरांनी हे वर्ष अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरे करून विद्यालयाची प्रगती साधू या, असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पत्रकार प्रसाद इनामदार, भालु जोशी, राजकुमार बन्ने स्कूल कमिटीचे सदस्य निवृत्ती साळुंखे, अजित पाटील, संदीप नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, चंद्रकांत पाटील, सुधाकर पाटील, रेखा पवार यांच्यासह सौंदलगा भिवशी,आडी येथील विविध संस्था, दूध डेअरी यांचे पदाधिकारी माजी विद्यार्थी सर्व शिक्षक, शिक्षण प्रेमी, देणगीदार, हितचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. व्ही. यादव यांनी केले तर आभार एस. डी. कुंभार यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta