Friday , November 22 2024
Breaking News

तिरंग्याचा मान वाढवा, राष्ट्रभक्ती जागवा!

Spread the love

 

राजू पोवार : अ‍ॅक्सिस बँकेत ’आझादी का अमृत महोत्सव’
निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचा योग सर्वांना आला आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणार्‍या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने ’हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व नागरिकांना यात सहभागी होऊन देशभक्ती जागृत करावी. स्वातंत्र्य सैनिकाबरोबरच रात्रंदिवस काम करणार्‍या पोलीस, जवान आणि अन्नदाता असलेल्या शेतकर्‍यांचाही अभिमान बाळाला पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होईल. तिरंग्याचा मान वाढवा, राष्ट्रभक्ती जागवा, असे मत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. येथील अ‍ॅक्सिस बँकेतर्फे ’आझादी का अमृत महोत्सव’कार्यक्रम झाला त्याप्रसंगी पोवार बोलत होते.
प्रारंभी राजू पोवार व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
पोवार म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये विविध बँकातून कर्ज मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळत आहे. कठीण प्रसंगातही सर्वसामान्य शेतकर्‍यांना बँकांकडून सहकार्य मिळत असल्याने आज शेतकरी टिकून यापुढील काळातही शेतकरी आणि बँका यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी सांगितले.
कार्यक्रमास संघटनेचे शहराध्यक्ष उमेश भारमल, सचिव भगवंत गायकवाड, आडी शाखेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, एच. एस. ढवणे, आप्पासाहेब पाटील, बँकेचे व्यवस्थापक जावेद शेख, सहाय्यक व्यवस्थापक श्रुती कट्टी-जोशी पुंडलिक चौगुले, ओंकार देसाई, विजय लोहार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी, राहीद काझी, सदाशिव जनवडे, गुरुदास देसाई, आरशद बागवान, धनश्री शिंदे, शाश्वती चिकाडे, प्रकाश रुपाले यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते व बँकेतील कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

Spread the love  बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *