निपाणी (वार्ता) : येथे झालेल्या निपाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ निपाणी संचलित
नूतन मराठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. यामध्ये उत्कर्ष कांबळे 400 मीटर धावणे मध्ये प्रथम, जैद हवालदार 100 मीटर धावणे द्वितीय व 200 मीटर धावणे तृतीय, समर्थ बाबर 1500 मीटर धावणे तृतीय, प्रथमेश पावले 3000 मीटर धावणे तृतीय, धनश्री पवार 100 मीटर धावणे प्रथम 200 मीटर धावणे प्रथम, उंच उडी प्रथम, सुकन्या पत्रावळे उंच उडी द्वितीय, प्रथमेश खामकर उंच उडी द्वितीय, सार्थक बाबर उंच उडी तृतीय, मानसी खोत 600 मीटर धावणे तृतीय, जैद बेपारी उंच उडी द्वितीय.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पचंडी, क्रीडा शिक्षक यू आर पवार, ए. एम. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन चंद्रहास धुमाळ सर संस्थेच्या सेक्रेटरी व प्राचार्य अलका धुमाळ व संचालक विक्रमादित्य धुमाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta