युवा नेते उत्तम पाटील : माणकापुरात गॅसकिटचे वितरण
निपाणी(वार्ता) मतदार संघात कुठलेही काम , कुठल्याही योजना सत्ताधरी गटाच्या माध्यमातूनच करण्यात येतील असे वातावरण तयार करण्यात आले आहे. शिक्षण, आरोग्य, महसूल खाते अथवा पोलीस खाते आदीतील सर्व कामे सत्ताधरी गटाच्या मर्जीने करण्यास सांगितले जाते आहे. गेल्या दोन अडीच वर्षात खालच्या पातळीवरचे राजकारण सुरू आहे. विरोधी गट विकासकामे करत असल्यास त्यात अडथळे निर्माण करण्यात येत आहेत. मात्र या भागातील जनतेच्या आशीर्वादाने आपल्याला खासदार, मंत्री पदे मिळाली आहेत. मिळालेल्या सत्ता आणि शक्तीचा उपयोग करीत या भागातील विकासकामांना प्राधान्य द्या , असे युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितले.
ते माणकापूर येथे उज्ज्वला गॅस योजनेतून मंजूर झालेल्या गॅसकिट वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते १७ लाभार्थ्यांना गॅसकिटचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष वैशाली कुंभार , माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रुपाली चौगुले, अलका चौगुले, राकेश चौगुले, सुनील
म्हाकाळे, प्रमोद शेवाळे, सचिन शिंदे, विलासमती माने, धनंजय माळी, सचिन बेडकिहाळे, मल्लू हंडे, शीतल तेरदाळे, काकासो पाटील, सुधीर कांबळे, सर्जेराव कुंभार, आप्पासो हातगिने, पिंटू करवते, बंडा चावरे, प्रमोद माळी, अण्णासो चौगुले , कार्यकर्ते ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta