Saturday , October 19 2024
Breaking News

निर्णय बदलण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक!

Spread the love

 


काँग्रेस कार्यालयासमोर गर्दी : बुधवारी मराठा मंडळमध्ये बैठक
निपाणी (वार्ता) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दोन दिवसापूर्वी बैठक घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यापासून वर निपाणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी येथील काँग्रेस कार्यालयासमोर गर्दी करून निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी टाहो फोडला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बुधवारी (ता. ७) दुपारी तीन वाजता येथील मराठा मंडळ सांस्कृतिक जीवनामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती निपाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम यांनी दिली. त्यानंतर कार्यकर्ते कार्यालयापासून रवाना झाले.
आतापर्यंत आपल्याला पक्षाने पाच वेळा संधी दिली असून त्यामध्ये तीन वेळा विजयी झालो आहे. त्यामुळे यापुढील काळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याबाबतचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना पाठविले आहे. त्यानंतर गुरुवारी कार्यकर्ते व मतदारांच्या भावना अनावर झाल्याने त्यांनी थेट येथील काँग्रेस कार्यालय गाठून आपापल्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही परिस्थितीत काकासाहेब पाटील हेच विधानसभेचे उमेदवार असून त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, माजी आमदार काका पाटील यांनी आपला निर्णय बदलावा. बैठकीनंतर त्यांनी सांगितलेल्या उमेदवारालाच निवडून आणण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक संघ प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी श्रीनिवास संकपाळ, सचिन लोकरे यांच्यासह मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी शंकर दादा पाटील, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, विश्वास पाटील, रोहन साळवे, निकु पाटील, नवनाथ चव्हाण, असलम शिकलगार अशोक लाखे, इंद्रजीत बगाडे, बाबुराव खोत, शशी पाटील, अशोक पाटील, बबन घाटगे, दत्तकुमार पाटील, प्रतीक शहा, अरुण आवळेकर, बबन चौगुले, सुधाकर सोनाळकर, दिलीप पठाडे, झुंजार दबडे, विक्रम देसाई यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

अश्रू अनावर
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दोन दिवसापूर्वी घेतलेल्या निर्णयावर शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या भावना व्यक्त करताना अनेक कार्यकर्त्यांना अश्रू आनावर झाल्याचे दिसून येत होते.

मी फक्त ‘काका प्रेमी’
निपाणी मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेस कार्यालयासमोर जमून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी यरनाळ येथील दिनकर लकडे हे दोन पिढ्यापासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या गळ्यात मी फक्त ‘काका प्रेमी’ असा फलक लावून आपल्या भावना व्यक्त केल्या.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *