Tuesday , March 3 2026
Breaking News

अमलझरी येथील रेणुका मंदिराला आर्थिक सहाय्य

Spread the love

निपाणी : निपाणी जवळच असलेल्या अमलझरी गावातील लोकवर्गणीतून बांधलेल्या श्रीरेणुका मंदिराच्या पुढील कामकाजासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत BC(R) ट्रस्ट निपाणी शाखेकडून 1,50,000 रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आला. हा धनादेश चिकोडी जिल्हा निर्देशक टी. कृष्णा व निपाणी तालुका योजना अधिकारी श्री. जाफर अत्तार, निपाणी शाखा अधिकारी श्री. रामदास गौडा यांच्या शुभहस्ते श्री रेणुका मंदिर येथे देवस्थान कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी सदस्य, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी खोत यांनी करून या संस्थेबद्दल आपले अनमोल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांनी प्रथम देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कमिटी सदस्यांचा सत्कार करण्यात आला व श्री क्षेत्र धर्मस्थळाचे धर्माधिकारी श्री. डॉ. विरेंद्रजी हेगडे साहेब यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करून त्यांच्या कार्याची स्तुती करण्यात आली. टी. कृष्णा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना श्रीक्षेत्र धर्मस्थळ ट्रस्ट हि फक्त मंदिरांनाच मदत करीत नाही तर शैक्षणिक, सामाजिक, बचत गट, ग्रामिण भागाचा विकास, समुदाय भवन, ग्राहक सेवा केंद्र याच्या माध्यमातून खुप सेवा देण्याचे काम हि संस्था करीत असून याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी बाबासो खोत, शिवाजी खोत, अभिजीत कौंदाडे (ग्रा पं सदस्य), सचिन कौंदाडे, मलगोंडा कंकणवाडे, वसंत रेपे, दादासो पाटील, बळीराम खोत, कृष्णात बाडकर, पंडीत खोत, अतुल कोकरे, आण्णापा खोत, रामा खोत, हिंदुराव कांबळे, शंकर दावणे, बाळू रेपे, स्वप्नील कदम, सतीश कांबळे, अशोक कांबळे, चंद्रकांत खोत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी बळीराम खोत यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *