मंडळाला 25 वर्ष पूर्ण
हंचिनाळ : येथील दादा ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त विविध उपक्रमाने उत्साहात व शेवटच्या दिवशी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाने सांगता झाली.
येथील विठ्ठल मंदिर जवळ असलेल्या दादा ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा गणेश उत्सव विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला. 25 वर्षांपूर्वी गल्लीतील लहान मुले एकत्र येऊन 1997 साली या मंडळाचा प्रारंभ झाला होता.
चालू वर्षी मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष होते. त्यानिमित्त श्री संतोष हवलदार यांनी आकर्षक व मोठी मूर्ती मंडळाला देणगी दिली होती. आकर्षक सजावट, आकर्षक मूर्ती यामुळे मंडळाचा गणेशोत्सव उत्साही वातावरणात संपन्न झाला. शेवटच्या दिवशी सत्यनारायण पूजा झाली. या पूजेला श्री. उत्तम आणि सौ. सुजाता नलवडे दाम्पत्य यांना पूजेचा मान देण्यात आला. पौराहित्य सात्तया स्वामी यांनी केले.
त्यानंतर मंडळमार्फत प्रथम वेळेचा महाप्रसाद सार्थक नलवडे यांच्याकडून तर शेवटच्या दिवसाचा महाप्रसाद मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन पोवार यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गुरव, उपाध्यक्ष वैभव पोवार,सचिव पप्पू गुरव, खजिनदार रोहित कोंडेकर, मंडळाचे मार्गदर्शक गजानन पोवार, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष बाबासो अक्कोळे, महाराज कुमार गुरव, सरपंच बबन हवलदार, भरत चौगुले, शिवम नलवडे, सुधीर गुरव, यशोधन हवालदार, पंकज हवलदार, विशाल हवलदार, श्रीधर गुरव, प्रशांत हवलदार, आप्पासो निवृत्ती नलवडे, दादासो मजगे, दादू हवालदार, मोहन नलवडे, पार्थ गुरव, नवनाथ नलवडे, सौरभ हवालदार, शिवा पाटील, दिगू चौगुले, संदेश अकोळे, योगेश चौगुले, सौरभ नलवडे, सार्थक नलवडे, चेतन व विजय संकपाळ, आप्पा अरुण नलवडे, समर्थ गुरव, यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.