प्राचार्य डॉ. पी.एम. हेरेकर : निपाणी शाखेत सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : अवघ्या २५ वर्षात १० शाखा आणि ३६५ कोटी ठेवींचा टप्पा पार केलेल्या तसेच आधुनिक डिजीटल बँकींग प्रणाली घेऊन कामकरणारी रवळनाथ हौसिंग फायनान्सची कामगिरी संपूर्ण सहकारी जगताला मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार निपाणी शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर यांनी काढले. श्री. रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित निपाणी शाखेत मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. रवळनाथ हौसिंग फायनान्सचे पहिले मानद सचिव आणि विद्यमान निपाणी शाखा सल्लागार व्ही. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी मुलींची शाळा, निपाणीच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मालूताई धोंडीराम कुरळपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निपाणी शाखा सल्लागार रश्मी व्हदडी यांच्या हस्ते व पीएच.डी. पदवी संपादीत केल्याबद्दल देवचंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रविणसिंह शिलेदार याचा प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर यांचा स्मृतिचिन्ह व ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला.
व्ही. आर. पाटील म्हणाले, एम. एल. चौगुले यांचे अभ्यासू नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि पारदर्शक कारभार यामुळेच स्पर्धेच्या काळातही संस्थेची यशस्वी घोडदौड सुरु आहे.
याप्रसंगी प्रा. डॉ. प्रविणसिंह शिलेदार, मुख्याध्यापिका मालूताई कुरळपे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
रश्मी व्हदडी यांनी प्रास्ताविक केले. विद्यावती जनवाडे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. आर. पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास शाखाधिकारी उत्तम दळवी, अकौंटंट के. टी. पाटील यांच्यासह सभासद, कर्मचारी उपास्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta