निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोले यांनी आज बोरगांव येथे भेट देऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. येथील बिरेश्वर कार्यालय येथे या जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बिरेश्वर संचालक आर. एस. पचंडी यांनी स्वागत केले. बोरगांव येथील अनेक दीन दलीत, कष्टकरी, अनेक सुविधा पासून वंचित असणारे नागरिक, महिला वर्गाने खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे आपल्या विविध समस्या कथन केल्या. त्याचबरोबर गावातील रस्ते, गटारी, पाणी समस्या, मंदिर जीर्णोद्धार, पाणंद रस्ते यासह अनेक मूलभूत सुविधांची मागणी यावेळी नागरिकांनी केली.
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी काही कामे तत्काळ जागेवरच सोडवली तर काही कामे पुढील काळात केली जातील असे ठोस आश्वासन दिले. यावेळी जोल्ले म्हणाले, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी आम्ही सैदेव कटिबध्द आहोत. निपाणी मतदारसंघात अनेक विकास कामे रबिवण्यत आली आहेत. विशेष करून बोरगावसाठी कोट्यावधीचा निधी आणून गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. नागरिकांची काही कामे असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले.
येथील मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान संरक्षक भिंतीच्या कामासाठी, ईदगाह मैदान साठी मंत्री शशीकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून कोट्यवधीचा निधी देण्यात आला आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी खासदार अण्णासाहेब जोले यांनी करून योग्य त्या कामकाजाबाबत ठेकेदारांना सूचना केल्या.
यावेळी वक्फ बोर्ड जिल्हा अध्यक्ष अन्वर दाडीवाले, आमदार दादासो भाले, रमेश मालगावे, बाबासाहेब चौगुले, देव माळी, शिसू एदमाले, शिवाजी भोरे, श्रीष्णू तोडकर, महापती खोत, अजित तेरदाले गुलाब आफराज, बशीर आफराज, फिरोज अफाराज, जमील आत्तार, राजु कुभार, जयपाल फिरगणावर, आयुब मकानदार, पिंटू बेवनकट्टी, शीतल हावले, निखिल चिपरे, रवी भोरे, काकासाहेब वाघमोडे, नारायण आडेकर, मधूकर हिरेमाणी, सुकमार हिरेमनी, शब्बीर गावंडी, अन्नप्पा डकरे, सर्जेराव दानवाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta